धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील होमगार्ड पथकात कार्यरत असलेला तुषार दगडू पाटील याच्या वैद्यकीय मदतीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील धावून आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख मिळवून देण्यासह त्यांनी १ लाखांची व्यक्तिगत मदत केली. तसेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ५० हजार, असे एकूण दीड लाख रुपये आज सकाळी तुषारच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.
तुषार पाटील यांच्या शरीरात ‘अप्लिस्टिक ऍनिमिया’ नावाचे इन्फेक्शन झालं आहे. सध्या तुषार मुंबई येथे ऍडमिट आहे आणि या कठीण परिस्थितीशी कडवी झुंज देतोय. त्याच्या ऑपरेशनसाठी साधारणतः चाळीस लाख रुपये अंदाजित खर्च सांगितलेला आहे. तुषारने पोलीस भरतीसाठी खूप मेहनत घेतली. परंतू आज ते स्वप्न मातीमोल होतांना दिसतंय. परंतू अशा कठीण परिस्थितीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील धावून आले. त्यांनी व्यक्तिगत १ लाखांची मदत तर केलीच. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख मिळवून देण्यासाठीचा पाठपुरावा देखील सुरु केला आहे.
धरणगाव शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी ५० हजार गोळा केले आणि आज सकाळी पालकमंत्र्यांची १ लाख आणि पदाधिकाऱ्यांचे ५० हजार असे एकूण दीड लाख रुपये तुषारच्या आईच्या सुपूर्द केले. यावेळी पालिकेतील माजी गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, संजय चौधरी, विलास महाजन, वाल्मिक पाटील, प्रशांत देशमुख, तौसीफ पटेल, सोनू महाजन, बुट्या पाटील, पवन महाजन, दिलीप पाटील हे उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने जेवढं शक्य असेल. त्यानुसार तुषारच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत करावी, असे आवाहन धरणगावकरांना केले आहे.