धरणगाव (प्रतिनिधी) वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माची पताका देशभरात रुजविण्याचे महान कार्य शेकडो वर्षांपासून सुरु आहे. किर्तनाच्या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असते. विवरे ते भालगाव हा १० कोटींचा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार असून सभामंडप बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील विवरे, बोरगाव खु. येथे हरीनाम कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमा प्रसंगी तसेच विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. दिवसभरात कासोदा, विवरे, बोरगाव येथे पालकमंत्र्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी किर्तन श्रवण केले हे विशेष
धरणगाव तालुक्यातील विवरे येथे गावांतर्गत २५ लक्ष निधीतून पेव्हिंग ब्लॉक मंजूर असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच भवरखेडा व बोरगाव खु. येथे ११८ वर्ष्याची परंपरा असलेल्या हरीनाम कीर्तन सप्ताह ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन कीर्तन श्रवण केले. यावेळी बोरगाव येथे श्री विठ्ठल मंदिर परिसरात १० लाखाचे तर विवरे व भवरखेडा येथे ५० लाखाचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाविक भक्तांना आश्वासित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेनेचे भैया मराठे सर यांनी केले. आभार उगलाल पाटील यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, सरपंच भैया महाजन, उपसरपंच पिंटू पाटील, बोरगाव सरपंच लक्ष्मन भिल, किशोर मराठे, नितीन पाटील, समाधान मराठे, दिलीप महाजन, ह,भ.प. शशी महाराज , स्वप्नील पाटील यांच्यासह भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भवरखेडा येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भवरखेडा येथील भिल्ल समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगवे उपरणे देऊन त्यांचे स्वागत केले. नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटन वाढीसाठी कार्य करण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी भिल्ल समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते बापू नाईक, रवींद्र निकम, बापू सोनवणे, ईश्वर मोहित, गोविंद मालचे, किशोर मोहित, सागर मालचे, उदय भिल, विठ्ठल भिल , देविदास भिल, भाऊसाहेब भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी घरकुल धारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भिल वस्तीत श्री हनुमान मंदिर बांधकामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकार्य केले. याप्रसंगी शिवसेनेचे उगलाल पाटील, सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच धनराज पाटील, दिलीप पाटील, संघटक सतीश पाटील, शाखा प्रमुख रवींद्र भिल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.