जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हुडको भागात सुशिक्षित जावेद शेख अख्तर व त्यांच्या पत्नी यांनी आपल्या अकरा वर्षाच्या कनीज फातिमा शेख मुलीला ती अपशकुनी असल्याने तिच्या सोबत अमानवीय कृत्य करून तिला मरण येईपर्यंत तिच्यासोबत अन्याय केला व तिला मारून टाकले. या घटनेचा जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी त्रीव निषेध करीत असून स्वतःला उच्चशिक्षित समजणारे केमिस्ट जावेद शेख एडवोकेट व डॉ. शेख साजिद व फिरोज शेख तसेच निलोफर परवीन यांचा सुद्धा धिक्कार करीत असल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
इस्लाम धर्मात अंधश्रद्धा व अपशकुनला थारा नाही
इस्लाम धर्मात अंधश्रद्धा व अपशकुन याला मान्यता नसून उलट पवित्र कुराणात स्पष्टपणे नमूद आहे की, ज्या आई-वडिलांनी मुलींचा उदरनिर्वाह करून तिला शिक्षण देऊन लग्न करून आपले कर्तव्य पार पाडले तर त्यांना स्वर्गात जागा मिळेल. तसेच आईच्या पायाखाली जन्नत (स्वर्ग) आहे व वडील स्वर्गाचे दार आहे. अशाप्रकारे इस्लाम धर्माने महिलांना उच्च पद दिले आहे. तसेच अल्लाह शिवाय कोणीही या जगात हानी व नफा पोहचू शकत नाही म्हणून कोणाला अशुभ-अपशकुनी मानणे म्हणजे शिर्क (अनेकेश्वर) होय.
१४०० वर्षा पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती
अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स) जेव्हा अरबमध्ये जन्मले तेव्हा त्यावेळी मुलींना जिवंतपणीच मारून टाकत असत. त्यावेळी मुहम्मद (स) यांनी इस्लामची शिकवण दिली. परंतु आज १४०० वर्षा पूर्वीच्या घटनेची जावेद शेख व त्याच्या कुटुंबीयांनी पुनरावृत्ती केली.
मामा अझहर अली व जळगाव पोलिसांचे अभिनंदन
याप्रकरणी आपली बहीणीचा सुध्दा समावेश असून सुध्दा कनिझचे मामा यांनी पोलिसांना तक्रार अर्ज करून चौकशीची मागणी करून कनिझला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला असता जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, चंद्रकांत गवळी, सपो अधीक्षक चिंता, स पो नी बडगुजर, व त्यांचे सर्व सहकारी यांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे सुद्धा कौतुक बिरादरीतर्फे करण्यात येत आहे.
जावेद कुटुंबियांचे वकील पत्र घेऊ नये – आवाहन
पवित्र अशा रमजान महिन्यात अशे कृत्य करणाऱ्यास कोणीही समर्थन देऊ नये, त्यांचे वकील पत्र घेऊ नये, असे आवाहन सुद्धा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.















