चाळीसगाव (प्रतिनिधी) चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर येथे घडली आहे. धक्कादायक म्हणजे पतीने पत्नीच्या गुप्तांगात लाल मिरची पावडर टाकून क्रूर पद्धतीने हा खून केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जगन पावरा (बारेला) (रा. रोहीणी भोईटी ता. शिरपूर जिल्हा धुळे ह.मु. तळोंदा दिगर ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. राजेश पावरा याचा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातून त्याने दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० ते दि. २६ पहाटे ६ वाजेच्या दरम्यान, तळोंदा दिगर शेत शिवारात पत्नीच्या गुप्तांगात घरातील लाल मिरची पावडर टाकून क्रूर पद्धतीने पत्नीची हत्या केली. या घटने प्रकरणी रामेश्वर रुपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 261/23 भा.द.वि. 302 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी पती राजेला अटक केली आहे.