मुंबई (वृत्तसंस्था) पतीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय बायकोला आला असून आज नवरा प्रेयसीला भेटायला जाणार असल्याची खात्री होती. त्यामुळे तिने त्याचा पाठलाग केला त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर तिने त्याला खेचत रस्त्यावर आणले आणि रस्त्यावरच त्याची धुलाई करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक महिला नवऱ्याला रस्त्यात बेदम मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाताच ते घटनास्थ्ळी दाखल झाले. तोपर्यंत अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे. आपला नवरा काही दिवसांपासून त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी येत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला संशय आल्याने आपण त्याचा पाठलाग केला आणि तो प्रेयसीकडे येत असल्याची खात्री पटली. तो शुक्रवारीही प्रेयसीला भेटायला आला होता. त्यानंतर आपण त्याला धडा शिकवल्याचे तिने पोलिसांनी सांगितले.
नवरा प्रेयसीकडे आल्याचे समजताच त्याची पत्नी त्याच्या प्रेयसीच्या घरी दाखल झाली. त्याला प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. घरातून खेचत रस्त्यावर आणले आणि त्याला बदडायला सुरुवात केली. तो पळत आहे आणि त्याची पत्नी त्याला बदडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याची प्तनी एवढी संतपाली होती की तिने त्याचे कपडेही फाडले. त्यानंतर पत्नीपासून वाचणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्याने रस्त्यातच बेशुद्ध पडल्याचा दिखावा केला. त्याचा हा बनावही बायकोने उघड केला आणि पुन्हा त्याला बदडायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस आल्याने त्याची सुटका झाली.