TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कारवाई करा : रोहिणीताई खडसे !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन !

vijay waghmare by vijay waghmare
August 29, 2024
in मुक्ताईनगर, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरील 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला नौदला मार्फत उभारणी करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला. या घटनेने छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या इतर व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, उबाठा गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटील, विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटिल यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्य संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथिल राजकोट किल्ल्यावरील भारतीय नौदला मार्फत उभारणी करण्यात आलेला आणि आठ महिन्या पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. हा प्रकार सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अवमान करणारा ठरतो शिवाय तो महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेवर परिणाम करणारा आणि प्रत्येक नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचवणारा आहे. आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो म्हणजे या पुतळ्याच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आणि कोणत्याही तांत्रिक बाबी तपासून न बघता घाईगडबडीत पुतळ्याचे अनावरण केल्याचे निदर्शनास येते. संबंधित घटनेला फक्त अधिकारीच जबाबदार नसुन सरकार सुद्धा जबाबदार आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली असुन सर्व नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे. यातून महाराष्ट्र राज्याच्या अपमान झाला असुन याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या घटनेतून अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अवमान आणि महाराष्ट्र राज्याची दुखावलेली अस्मिता याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजिनामा द्यावा. तसेच या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार, अधिकारी, व इतर जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी – रोहिणी खडसे
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चून राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी सर्वांच्या मनाला ठेच पोहचवणारी आहे. या घटनेमुळे सर्वांचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असुन महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली आहे. पुतळ्याचे बांधकाम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या निकृष्ठ कामासंदर्भात तक्रार केली होती परंतु, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, ज्या किल्ल्यावर पुतळा उभारला आहे तो शिवकालीन किल्ला इतक्या वर्षानंतरही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारणी करण्यात आलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? यातून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी कामातही भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येते तसेच तांत्रिक बाबी व पुतळा उभारणी साठी आवश्यक शासकीय बाबींची तपासणी न करता घाईगडबडीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या घटनेची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या

यावेळी यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लताताई सावकारे, भागवत पाटिल, प्रेमचंद बढे, अनिल पाटील, प्रविण पाटिल, बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल, सोनु पाटिल, प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, योगेश काळे, राहुल पाटिल, निलेश भालेराव, भुषण पाटिल, रउफ खान, अज्जू खान, सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल, सुभाष खाटीक, रफिक मिस्त्री, हरिभाऊ कवळे, भैय्या पाटिल, बाळा चिंचोले अजय अढायके आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जळगावात चिमुकलीवर अत्याचार; नराधमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025

भाजपची डोकेदुखी वाढली! सानपांच्या प्रवेशानं अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

December 22, 2020

‘गो कोरोनाचा’ नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

October 27, 2020

चोपडा पालिका अधिकाऱ्याची चार वर्षांनी होणार चौकशी !

December 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group