धरणगाव (प्रतिनिधी) शेतमालकाला मारहाण करून १५ ते १७ मजुरांनी मोबाईल आणि रोकड लांबवल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिपीनचंद्र जगन्नाथ तिवारी यांनी तालुक्यातील अनोरे येथील मुकादम तुकाराम रामा गायकवाड याच्याकडील सुमारे 15 मजूर शेतातील डाळिंब काढण्यासाठी कामाला लावलेले होते. सदर मजूर कामासाठी आले होते. परंतू ते काम न करता शेतामधून निघून गेले. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शामखेडा शिवारातील माझ्या शेतात हजर होतो. तेव्हा शेतात कृष्णा बारेला, रामलाल करोले, राजु बारेला हे मजूर शेतात डाळिंब तोडत होते.
मजुरांपैकी संदिप रतिलाल सोनवणे (रा. आनोरा ता. धरणगाव), शादु नाईक (रा. कडारी ता. अमळनेर), गोपाल (पुर्ण नाव माहीत नाही), नरेश (पूर्ण नाव माहीत नाही), 5) सागर (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्वे रा. आनोरा ता. धरणगाव) व त्याच्यासोबत 15 से 17 लोकांनी हातात विळा, लोखडी कुऱ्हाड, काठ्यांनी काहीएक न बोलता मारहाण केली. तसेच ओप्पो कंपनिया 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईलने सदर लोकांची शुटिंग करीत असताना मारहाण करणाऱ्यापैकी एकाने मोबाईल हातातून हिसकावून घेतला. तसेच एकाने पॅन्टच्या उजव्या खिश्यात हात टाकून खिश्यातील 5 हजार रुपये रोख जबरीने काढुन घेतले. यानंतर मारहाण करीत असतांना एकाने डोक्यावर कुऱ्हाड मारून दुखापत केली.
बिपीनचंद्र तिवारी यांना मारहाण सुरु शेतातील काम करणारे इतर मजूर वाचविण्यासाठी धावत आल्याचे पाहून 1) संदिप रतिलाल सोनवणे, 2) शाह नाईक, गोपाल (पूर्ण नाव माहीत नाही), 4) नरेश (पूर्ण नाव माहीत नाही), 5) सागर (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व व त्यांच्या सोबतचे 15 ते 17 जणांनी तुझ्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु असे म्हणून शेतातून निघून गेल्याचेही तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेय. दरम्यान, भादवी कलम ३९५, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.