जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने कोल्हे हिल्स परिसरात नेवून अत्याचार केला. या अत्याचारातून संबधित मुलगी गर्भवती राहिली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे आहे की, समतानगरात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तीच्या घराजवळ राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने तिला लग्नाचे आमीष दाखवले. यानंतर ऑगस्ट ते सप्टेबर २०२० या दोन महिन्यात तिला कोल्हे हिल्स परिसरात घेऊन जात तीच्यावर अत्याचार केले. यातून मुलगी गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरूवारी तालुका पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक कल्याण कासार तपास करीत आहेत.