जळगाव (प्रतिनिधी) पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ४६ वर्षीय व्यक्तीची २ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील होंडा शोरुम समोर अजिंठा चौफुली येथे ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नथू काशिनाथ कोळी (वय ४६ रा. बाळापूर फागणे ता. जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ मार्च २०२२ रोजी भैय्या माहाजन, अजिंठा चौफुली येथे भेटलेला एक अनोळखी इसम व मो. क्र. ९१७५०८७३२९ यांने संमगनत करुन नथु कोळी यांचा विश्वास संपादन करुन तिप्पट पैसे करुन देण्याचे आमीष दाखवुन दोन लाख रुपये घेऊन त्यांना ५०० रुपये दराच्या बनावट नोटांचे २ बंडल असलेली बॅग देऊन ६ सहा लाख असल्याचे भासवून फसवणुक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.