जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या मूळ ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२१ करिता १५ जानेवारी, २०२१ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १५ जानेवारी २०२१ या दिवशीचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट १८६२ चे कलम ५ (अ) व (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुक असलेल्या एकुण ७८३ ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या गावांचा १५ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी आठवडे बाजार असेल त्या गावाचा आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.