जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खाजगी रुग्णालयात रुग्णांची लूटमार सुरू असून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी महापौर, उपमहापौरांनी अचानक शहरातील काही खाजगी रुग्णालयांना भेटी देत माहिती जाणून घेतली.
यावेळी महापौर, उपमहापौरांनी सहा खाजगी रुग्णालयांची पाहणी केली. महापौरांनी यावेळी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी देखील चर्चा केली. पाहणी दौरा अद्याप सुरू असून याबाबत सायंकाळी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.