जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आसोदा गावातील सत्तार खाटीक यांच्या घराला १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली होती. या आगीत खाटीक यांच्या घरातील सर्व संसारपयोगी साहित्य, किराणा, डब्यात ठेवलेल्या नोटा असे सारे काही जळुन खाक झाले. आधीच मोलमजुरी करणाऱ्या हे कुटुंब या आगीमुळे रस्त्यावर आले. घरातील कोणतीच वस्तु शिल्लक न राहिल्यामुळे त्यांना एक दिवस गुजराण करण्यासाठी देखील व्यवस्था नव्हती. ही माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुंबईतून कार्यकर्त्यांना सूचना केल्या. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मदतीने १७ ऑक्टोबर रोजी लागलीच या कुटुंबाला जीवनावश्यक साहित्यांची वाटप करण्यात आली.
एकाच दिवसात ही मदत मिळाल्यामुळे पिडीत कुटुंबाला अश्रु अनावर झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आपल्या पाठीशी असल्याचे समाधान खाटीक कुटुंबासह आसोदा गावकऱ्यांना वाटले. साहित्य वाटप प्रसंगी हाजी समद खाटीक, वाहेद खाटीक, असलम खाटीक, रफीक खाटीक, बबलु खाटीक, बाबु खाटीक, पंस सदस्य तुषार महाजन, विकास सोसायटीचे चेअरमन बापु महाजन, किशोर चौधरी, विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश कोळी, अनिल कोळी, पिंटु मेंबर, बाळकृष्ण पाटील, उमेश पाटील,सुनिल पाटील, शरद नारखेडे, युवासेनेचे तालुका प्रमुख अजय महाजन, संजय माळी, आकाश माळी, दीपक माळी, सनी पाटील, शुभम पाटील, मंजूर खान आदी उपस्थित होते.