चेन्नई (वृत्तसंस्था) नवीन लग्न झालेल्या नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याच्या कारणावरून नवविवाहितेने गळफास लावत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रमया असं या मृत महिलेचं नाव असून ६ एप्रिलला तीचा विवाह झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमया कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवाशी असून ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. दरम्यान ६ एप्रिलला तीचा कार्तिकेयन या तरुणाशी तीचा विवाह झाला होता. लग्न झाल्यावर तिला आपल्या नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याचं समजलं आणि ती आपल्या माहेरी आईच्या घरी राहू लागली होती. त्यानंतर तीने आपल्या नवऱ्याला कुड्डालोर शहरात रुम भाड्याने करण्यासाठी सांगितलं होतं.
कुड्डालोर शहर हे त्यांच्या घरापासून ४ तासाच्या अंतरावर होतं. रुम भाड्याने करण्याच्या कारणावरुन त्यांची अनेकवेळा बाचाबाची झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी रमयाने राहत्या घरी फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची तीच्या आईने पोलिसांना सांगितलं. तीला उपचारासाठी कुड्डालोर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत. पण उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात तीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे.