जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटतच असल्याचे चित्र आहे. आज अवघे ४४ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. तर जिल्ह्यातून आज ९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १३, जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ-१२, अमळनेर-००, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-००, रावेर-०३, पारोळा-०१, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार १९३ पर्यंत पोहचली असून ५० हजार ०८६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ८४० रुग्ण सध्या उपचार घेताय.