जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील ७० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी ३ रोजी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रीम कॉलोनी परिसरात हुसेन गयास पटेल(वय ७०) हे वृद्ध आपल्या परिवारासह रहायला होते. ३ रोजी शनिवारी सकाळी ७ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. त्यांना वैदकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.