धरणगाव (प्रतिनिधी) वृद्धाचे बँकेतून काढलेले २५ हजाराची रोकड लांबवल्याची घटना धरणगावात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशवराव भिका पाटील (वय ६६, व्यवसाय-शेती रा.प्लॉट नं. ६१ रामकृष्ण नगर) यांनी दि. २ जुलै रोजी दुपारी १२.४० ते दुपारी ०२.०० वाजेचा दरम्यान युनियन बँकेतून बीबियाणासाठी पैसे काढले होते. त्यानंतर ते बालाजी ऑनलाईन सर्विसेस या दुकानावर गेलेत. याच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने केशवराव पाटील यांच्या हॅन्ड बॅगमधून २५ हजाराची रोकड चोरुन नेली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















