मुंबई (वृत्तसंस्था) : ऑनलाईन फसवणूकीसाठी ‘whatsapp’चा सर्रास वापर केला जातो. असाच एक प्रकार घाटकोपर परिसरात घडला. एका वयोवृद्ध व्यक्तीची एका महिलेने ऑनलाईन फसवणूक केली आहे.
या महिलेने व्हिडीओ कॉल केला आणि कपडे काढण्यास सुरवात केली. त्यानंतर या कॉलचे रेकॉर्डींग बनवून त्यांना पाठवले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. यात या वयोवृद्ध व्यक्तीची 2.21 लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघ़डकीस आले आहे. 5 सप्टेंबरला एका अज्ञात नंबरवरुन वयोवृद्ध व्यक्तीला Whatsapp वर मेसेज आला की ‘मी जयपूरचा आहे’ त्यानंतर त्याच नंबर वरुन त्यांना कॉल आला. कॉल उचलल्यानंतर त्यांना एक महिला कपडे काढताना दिसली आणि या महिलेने त्यांना पण असं करण्याचा आग्रह केला, पण तेव्हा त्यांनी लगेच फोन कट केला. त्यानंतर काही तासानंतर त्यांना एका फेक पोलिस अधिकाऱ्याचा कॉल आला. हा पोलिस अधिकारी म्हणाला की त्याच्याजवळ एका महिलेच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग आहे. जर योग्य रोख रक्कम मिळाली नाही तर व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात येईल. त्याने बँक अकाउंट्सचे डिटेल्स शेअर केले. त्यानंतर वयोवृद्ध व्यक्तीने भीतीपोटी त्या अकाउंट वर पैसे पाठविले.
















