धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी शांताराम बुधा भराडी (वय ४०) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शांताराम भराडी हे सोमवारी सकाळपासून शेतात काम करीत होते. भरदुपारनंतर घरी आल्यावर त्यांची अचानक प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात नेल्यात आले. रस्त्यातच त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, त्यांचा मृत्यू उष्मामाघाताने झाला असावा अशी शक्यता नातलगांनी व खासगी डॉक्टरांनी वर्तवली आहे.