साकळी ता. यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील चुंचाळे येथील ग्राम पंचायत मधिल रिक्त असलेले पद तात्काळ व पारदर्शक्तपणे भरावे या मागणीचे निवेदन आज दिनांक ४ डिसेंबर रोजी यावल पचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात चुंचाळे ग्रामपंचायतेतील शिपाई पद हे गेल्या सहा महिन्यापासून रिक्त असून सदरचे शिपाई पद ही भरती तात्काळ काढण्यात यावी. व पद भरतेवेळी गावात दंवडी देण्याच्या सुचना संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास द्यावी अशी मागणी धनसिंग पाटील व ग्रामस्थ यांनी केली आहे तसेच सदर शिपायाची जागा भरतांना योग्य तो पात्र उमेदवार गावातुन निवडण्यात यावा किवा सदर शिपाई पद भरतीस शासन निर्णयाप्रमाणे शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता असलेला उमेदवार निवडला जाईल. यांची खबरदारी वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात यावी. संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे ते त्यांच्याच मर्जितील उमेदवाराची निवड करण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत पदाधिकार्याचा सदर शिपाई पद उमेदवाराची निवड करतांना कोणताही हस्तक्षेप होणार नाही किवा करणार नाही. याची उपाय योजना करावी. जेणे करुन गावातील योग्य उमेदवाराची निवड योग्य उमेदवाराची होईल तसेच शिपाई पदासाठी लेखी परिक्षा घेतल्यास सुशिक्षित तरुनांना संधी मिळेल. तरी आपणांस निवेदनाद्वारे विनंती आहे की सदर निवेदन पालकमत्री गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव यांना देणार असल्याचे धनसिंग पाटील यांनी सांगितले. निवेदनावर जाबिर तडवी, शेखर तडवी, शिवाजी गजरे, शरीफ तडवी, मुबारक तडवी, समिर तडवी, सलमान तडवी, सद्दाम तडवी, मुस्तुफा तडवी, अशरफ तडवी, जावेद तडवी, प्रकाश चौधरी, नरसिंग पाटील, हैदर तडवी, छबु तडवी, फिरोज तडवी, सलमान तडवी, पीताबंर धनगर, अक्षय पाटील, दिनेश पाटील, दिलदार तडवी, समिर तडवी, निशीकांत गजरे, अभिषेक सावळे, सचिन मराठे, याकूब तडवी, योगेश पाटील, रमेश धनगर, मेहरबान तडवी, मंजुर तडवी, हुसेन तडवी, सुलेमान तडवी, मिलीद सावळे, रमजान तडवी, प्रशांत पाटील, हसन तडवी, दिपक नेवे, उत्तम पाटील, रशिद तडवी, लतीफ तडवी, सिकदंर तडवी, संजय पाटील,प्रमोद चौधरी, कलिदंर तडवी, समाधान पाटील, विक्की पाटील आदीच्या साक्षर्या आहे