नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोन्याच्या किमतीमध्ये (Gold Price) तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 55,558 रुपये प्रति 10 ग्रामवरून घसरून 51,475 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 5,600 प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. पुण्यात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51700 एवढा आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47380 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51680 रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलो 68 हजार रुपये इतका आहे. दरम्यान सोन्याची खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सोन्याचे दर हे त्याची शुद्धता आणि दागिन्यांच्या डिजाईनवरून थोड्या-फार फरकाने कमी जास्त होऊ शकते.
सोन्यातील गुंतवणूक वाढली
दरम्यान दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. सोन्याचे भाव वाढत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यामधील गुंतवणूक अचानक वाढली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.