चंदीगड (वृत्तसंस्था) शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल जेव्हा पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. भटिंडा विमानतळावरतुन रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती. त्यामुळे पीएम मोदींचा ताफा १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल जेव्हा पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल सिद्धूनी केला. तसेच, मोदीजी, तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते, पण त्यांच्याकडे जे होते तेही तुम्ही काढून घेतले, अशी टीकाही केली.