अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन मागच्या वर्षी केले गेले होते. कोरोना परिस्थितीमुळे बक्षीस वितरण समारंभ रखडला होता. त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज अमळनेर येथे माळी समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरण पार पडला.
संत सावता महाराज स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील उपशिक्षक ईश्वर रामदास महाजन यांचा तृतीय क्रमांक आल्याने अमळनेरला संत सावता महाराज कार्यालयात बक्षीस वितरण करण्यात आले.
याशुभप्रसंगी संत सावता महाराज यांचे वंशज गुरूवर्य रविकांतजी महाराज वसेकर यांच्या हस्ते बक्षीस स्विकारतांना महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी येथील उपशिक्षक तथा पत्रकार ईश्वर रामदास महाजन सोबत समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील, साहित्यिक गोकूळ बागूल, मनोहर महाजन, डॉ. उदय खैरनार, प्रा.नितीन चव्हाण, प्रविण महाजन, माळी महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर चौधरी, कळमसरे येथील माळी समाजाचे अध्यक्ष प्रा. हिरालाल पाटील, अँड. नागराज माळी, महेश माळी, माळी समाजाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वर महाजन यांचे यशाचे अभिनंदन महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन विलासराव पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, शिवचरण फाउंडेशनचे अध्यक्ष डाँ शिवचरण उज्जैनकर, देवगांव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, दैनिक शब्दगंगाचे संपादक देवेंद्र पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, समता शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंके, भरवस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय सोनवणेसह अनेक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.