धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावज पाटील, जि.प सदस्य गोपाळ बापू चौधरी, पंस सभापती प्रेमराज बापू पाटील यांच्या हस्ते ५ लाख दलित वस्ती काँक्रेटिकरण, ३ लाख दलित वस्ती निधी पेव्हर ब्लॉक, ३ लाख पेव्हर ब्लॉक, मुतारी व गटार ढापे ३ लाख कामांचे भूमिपूजन पार पडले.
पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी गंगापुरीमध्ये विकासाची गंगा अवतरली आहे. असे प्रतिपादन जिप सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच महेश पाटील, उपसरपंच एस पि पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पाटील, निंबा पाटील, शाखाप्रमुख जिभाऊ पाटील, दीपक पाटील महाराज, सुनील धनगर, संजय पाटील, यज्ञेश्वर पाटील, एकनाथ पाटील, अधिकार पाटील, आत्माराम पाटील, नथु पाटील, राहुल पाटील, गुणवंत पाटील, समाधान पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.