जळगाव (प्रतिनिधी) शेतात जात असताना अंगावर घेतलेली शाल बैलगाडीच्या चाकात अडकून गळफास लागल्याने महिलेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. भादली, ता. जळगाव), असे मयत शेतमजूर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणाऱ्या जानुबाई बारेला या शनिवारी बैलगाडीने शेतात जात होत्या. त्यावेळी अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकली. यात त्यांच्या मानेला गळफास बसला व गळ्यात असलेल्या दागिन्यांमुळे जबर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ाशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















