TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य शासनाच्यावतीने देशमुख कुटूंबियांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in चाळीसगाव, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या जयघोषात इन्फन्ट्री बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिंगबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळगावी पिंपळगाव, ता. चाळीसगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनातर्फे यश देशमुख यांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

गुरुवार 26 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदींसह अधिकारी, देशमुख कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने सैनिक कल्याण मंत्री भुसे, पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह खासदार पाटील, आमदार चव्हाण यांनी, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राऊत, पोलीस दलाच्यावतीने गोरे, सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने पाटील, उपविभागीय अधिकारी साताळकर यांनी व लष्कराच्यावतीनेही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

सैनिक कल्याण मंत्री भुसे म्हणाले, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात यश देशमुख शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयाप्रती राज्य शासनाच्या सहवेदना असून यश यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शहीद यश देशमुख यांच्या कार्याची दखल घेण्यात येईल. शहीद देशमुख यांच्या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. खासदार श्री. पाटील म्हणाले, की जवान यश देशमुख यांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची नोंद इतिहासात होईल. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच त्यांचे यशोथित स्मारक उभारण्यात येईल, असे आमदार श्री. चव्हाण यांनी श्रध्दांजली वाहताना सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांनी श्रध्दांजली वाहिली.

तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता यश यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटूबिय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिस दल, सैन्य दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर यश देशमुख यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू पंकज यांनी अग्नीडाग दिला. शहीद यश यांच्यामागे आई- वडील दिगंबर देशमुख, सुरेखाबाई देशमुख, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
Next Post

फडणवीसांनीही धमकीची भाषा वापरली - राऊतांचा पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महा कृषी ऊर्जा अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ; ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे आवाहन

March 23, 2021

Horoscope : राशीभविष्य, शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘हग डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 12, 2022

बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी

July 19, 2024

शिवसेना खासदार संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group