नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोना संकटात सापडल्याने लोक अक्षरश: काकुळतीला आले आहेत. संकटाच्या या काळात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले आहे. यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. असं राहुल यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की सर्व राजकीय कामे बंद करावी आणि फक्त लोकांची मदत करावी. शक्य त्या प्रकारे लोकांचे दु:ख दूर करावे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
या अगोदर “केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्या ऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे.” असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. तसेच, “कोरोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू होऊ शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी केंद्र सरकारला उद्देशून म्हणाले आहेत.
















