जालना (वृत्तसंस्था) शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी करमाड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर बदनापूर तालुक्यातील ढासला येथील ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षकाला अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संशयित शिक्षक जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवाशी असल्याचे वृत्त एका चॅनेलने दिले आहे.
स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहणारी एक विद्यार्थिनी ढासला येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. बारावीला ती पासही झाली. त्यानंतर ती भावासह लाडसावंगीत एमएससीआयटीच्या वर्गासाठी मोटारसायकल वरून येत असत सदरील विद्यार्थिनी, तिचा भाऊ लाडसावंगी येथे आल्यानंतर भाऊ ट्युशन साठी दुसरीकडे गेला. ही विद्यार्थिनी क्लाससाठी दुसऱ्या ठिकाणी गेली.
ट्युशन सुटल्यानंतर भाऊ तिला घेण्यासाठी आला असता तिच्या मैत्रिणीने व शिक्षकांनी ती आज क्लासला आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिचा भाऊ परत घरी निघून गेला. त्यामुळे सदरील विद्यार्थिनीच्या आईने करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान शाळेतील इंग्रजी विषयाच्या एका शिक्षकाचा अधूनमधून फोन येत होता. या शिक्षकानेच आपल्या मुलीस कुठेतरी नेले असावे असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.
दुसरीकडे ही बाब समजताच संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी सकाळीच सोनामाता हायस्कूल गाठून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. तसेच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाला निलंबित करावे, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,यासह विविध मागण्या करत शाळेला टाळे ठोकले. आरोपी शिक्षकाला अटक होत नाही तसेच मुलीला जोपर्यंत पालकांच्या ताब्यात परत देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात तणावाचे वातावर निर्माण झाले होते.
महेंद्र साठे असं विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या शिक्षकाचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असल्याचे ‘साम’ टीव्हीने दिले आहे.
शिक्षकाने फूस लावून पळवून नेलेली विद्यार्थिनी नुकतीच सोनामाता माध्यमिक आणि उच माध्यमिक हायस्कूलमधून बारावी परीक्षा पास झाली होती. याच शाळेत महेंद्र साठे हा इंग्रजी विषय शिकवत होता. दरम्यान, बारावी पास झाल्यानंतर महेंद्र याने पीडित विद्यार्थिनीला संगणकाचे क्लास लावण्याचा सल्ला दिला. बदनापूर येथे क्लास लावून देतो, असे सांगत त्याने मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास विद्यार्थिनीला तेथे बोलावून घेतले. दरम्यान, विद्यार्थिनी तेथे गेली असता, महेंद्र याने तिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार विद्यार्थिनीच्या पालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनामाता विद्यालयात धाव घेतली होती.