TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्ष कारावास !

vijay waghmare by vijay waghmare
May 15, 2024
in अमळनेर, कोर्ट
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) वर्गात पाणी पिण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर न्यायालयातील न्या. पी. आर. चौधरी यांनी दिला.

चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल संतोष भागवत याने दि. ४ फेब्रुवारी रोजी वर्गाला खेळण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी पिण्यासाठी आली असता, सुनिल भागवत यांनी त्या मुलीचा हात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी शिक्षक त्या मुलीच्या घरी जावून त्याने तिच्या पालकांचा मोबाईल क्रमांकावरुन तिच्यासोबत अश्लिल भाषेत संभाषण केले होते. हा प्रकार मुलीच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेत जावून मुख्याध्यापकांसह पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानतर चोपडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुनील भागवत यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

९ जणांची साक्ष ठरली महत्वपूर्ण

हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये तपासी अधिकारी, पीडितेचा जबाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्या. पी. आर. चौधरी यांनी सुनील भागवत याला दोषी ठरवित शिक्षा सुनावली.

अशी सुनावली शिक्षा !

बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ८ नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्यांची साधी कैद अशी स्वतंत्र शिक्षा सुनावली आहे. आरोपी संतोष भागवत यांना एकूण आठ वर्षे शिक्षा भोगावी लागून ७५ हजार रुपये दंड भरावा लागेल.

भरपाईसाठी मागू शकते दाद !

अपिलाचा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम पीडितेला द्यायची आहे. तसेच सरकारी वकिलांनी निवड्याची प्रत पीडितेस द्यायची आहे. पीडिता जिल्हा विधी सेवा समितीकडे अधिक भरपाई साठी तसेच तिच्या मानसिक आधारासाठी दाद मागू शकते असेही आदेशात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerCrime

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

पोलिसांनी पुरलेला मृतदेह उकरून काढत मुलाच्या केला स्वाधीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा !

November 6, 2024

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा !

October 20, 2021

देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेला मृत्यू !

August 4, 2025

जन्मठेपेच्या शिक्षेतून तिघांची निर्दोष मुक्तता ; अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला महत्वपूर्ण !

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group