मुंबई (वृत्तसंस्था) काही वर्षांपूर्वी 10 रुपयाच्या नोटेवर लिहिलेला ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कुसुम नावाच्या मुलीने दहा रूपयांच्या नोटेवर एक पत्र लिहिलं जे तिचा प्रियकर विशालसाठी होतं. हे पत्र इतकं व्हायरल झालं की ते आता तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचलं आहे. त्याने देखील कुसुमच्या या पात्राला उत्तर दिलं आहे.
कुसुमचे 26 एप्रिलला लग्न आहे. ते लग्न तिच्या मनाविरोधात होत असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळेच तिने एका दहाच्या नोटेवर “विशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. त्या आधी मला पळवून ने. आय लव्ह यू, तुझीच कुसूम.” असा संदेश लिहिला होता आणि तो संदेश विशालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता याच नोटेला उत्तर देणारी दुसरी नोट व्हायरल होत असून त्यावर विशालने उत्तर लिहिलंय. विशालने या नोटेवर लिहिलं आहे की, “कुसुम मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला न्यायला येईन. आय लव्ह यू. तुझाच विशाल’.
आता हा विशाल खरंच कुसुमपर्यंत पोहोचणार का? तो कुसुमला पळवून नेणार का? की कुसुमचे नातलग त्याला धू-धू धुणार? विशालचे ‘मिशन कुसुम’ यशस्वी होणार का? की फेल जाणार? या सर्व गोष्टींची उत्तरं आजच म्हणजे मंगळवारी मिळणार आहेत. कारण आजच कुसुमचं लग्न आहे. ही नोट आता कुसुमच्या नातेवाईकांपर्यंतही पोहोचली असेल हे नक्की. त्यामुळे कुसुमचे नातेवाईक विशालची वाटच पाहत असणार, कधी एकदा तो हाताला लागतोय आणि कधी एकदा त्याला फटके देतोय अशीच भावना त्यांची असेल.
महत्त्वाचं म्हणजे कुसुमच्या विशालला घातलेल्या आर्त सादाची आणि विशालने त्याला दिलेल्या उत्तराची, या दोन्ही नोटा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. या नोटेवरील माहितीवरुन स्पष्ट समजतं की, कुसुम नावाच्या एका मुलीचं 26 एप्रिल रोजी लग्न ठरलं असून ते लग्न तिच्या मनाविरुद्ध होतंय. त्यामुळे तिने या नोटेच्या माध्यमातून तिच्या प्रियकराला साद घातलीय. त्यामध्ये 26 तारखेच्या आधी आपल्याला पळवून ने असं सांगितलं आहे.
















