मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पिंप्राळा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपये किंमतीच्या वाळूचा उपसा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तलाठी प्रवीण रमेश शिंपी (44, पिंप्राळा घोडसगाव, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंप्राळा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून चोरट्यांनी 1 डिसेंबर 2022 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान अज्ञातांनी अहोरात्र वाळूचा उपसा करीत सुमारे सहा लाख रुपये किंमतीची 150 ब्रॉस वाळू लांबवली. तपास पोलीस नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत. दरम्यान, विशेष म्हणजे अवैधरीत्या वाळू उपसा केला जात असताना महसूल प्रशासन नावाची यंत्रणा करीत तरी काय होती? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.