जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा परिसरात इंद्रनिल सोसायटी घरातून ८२ ग्रॅम वजनाचे दागीने चोरुन नेल्याची घटना घडली होती. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेणा-या चोरट्यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपासकामी चोरट्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुरलीधर अनिल तेली (इंद्रनिल सोसायटी पिंप्राळा जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी इंद्रनील सोसायटी पिंप्राळा भागातील घरातून मुरलीधर तेली याने ८२ ग्रॅम वजनाचे दागीने चोरुन नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे पथक करत होते. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. गुन्हा घडल्यापासून मुरलीधर अनिल तेली शहरातून गायब झाला होता. संशयाची सुई त्याच्यावर असतांना तो शहरात आल्याचे समजताच त्याला ताब्यात घेत विचारपुस करण्यात आली. त्याने गुन्हा कबुल करत चोरीचा मुद्देमाल पोलिस पथकाला काढून दिला. याप्रकरणी त्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.