जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन निरीक्षक बकालेजवळ एलसीबीला कुणाकुणाकडून हप्ते येतात याची यादी असल्याची माहिती मराठा समाजाच्या नेत्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली होती. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ती कलेक्शनची कथित यादी व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या यादीची विश्वासर्हता किती?, यादी खरी की बनावट? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय.
हवाला मार्गे पैसा येत असल्याचा दावा
बकालेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी मराठा समाजबांधवांनी मंत्र्यांना बकाले हा त्याला अटक केल्यास इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याची ते धमकी देत आहे, अशी माहिती ना. पाटील यांना दिली. दरम्यान, दुसरीकडे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या यादीत सदरची एकूण रक्कम 90 लाख ते 1 कोटीच्या घरात असून सदर रक्कम भुसावळ येथील एका जैन यांच्या मार्फतीने जळगावमधील सराफ बाजारातील ज्वेलर्सच्या येथून हवाला केला जातो, असेही म्हटले आहे. एवढेच नावेह तर, जैन नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील तिथं दिलेला आहे.
गुटखा किंग लोकांची नावं खरी?
बकालेच्या नावाने व्हायरल झालेली यादी काही व्हाटसअपग्रुपवर व्हायरल झाली आहे. दरम्यान, ही यादी हस्त लिखित नसून कॉम्पुटर प्रिंट आहे. विशेष म्हणजे यादीत गुटखा, रेशनसह इतर असलेली नावांची लोकं त्याच व्यवसायात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील हंसू शेठ जळगाव जिल्ह्यातील गुटखा किंग असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर सुशील हे चाळीसगाव परिसरातील पट्टा सांभाळत असल्याचे कळते. तर बर्हानपूर येथील विकी नामक तरुण काही दिवसांपूर्वीच गुटख्याच्या व्यवसायात उतरला असून तो हंसू शेठला टक्कर देत असल्याचीही माहिती सूत्रांनी द्लीली आहे. तर दुसरीकडे कलेक्शनच्या आकडेवारी मात्र, मुद्दाम फुगवून लिहिल्याचे जाणवत आहे. तसेच यादीमध्ये काही ठिकाणी पूर्ण नाव तर काही नाव मोघम आहेत. यादीची वैधता नसल्यामुळे बातमीत सर्वच नाव फक्त मोघम घेण्यात आली आहे.
जाणून घ्या…सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या यादीत नेमकं काय लिहिलंय?
अवैध गुटखा
भाटीया दिल्ली शिखर गुटखा अवैध -15 लाख, हंसु शेठ गुटखा-3.5 लाख रुपये सुशील गुटखा सिंधी-3.5 लाख रुपये, विकी बहनपुर गुटखा- 3 लाख, जेसवानी गुटखा जळगांव-2 लाख रुपये, अशोक गुटखा-2 लाख, दिलीप 02 लाख,रिंकु मेवा- 2 लाख,कारडा चाळीसगांव-1 लाख,देवरे 50 हजार,पंकज सुपारी चोपडा जळगांव-50 हजार,
रेशन
वाणी चोपडा- 3.5 लाख रुपये, चौधरी पारोळा- 3 लाख रुपये, सनी पचास- 2 लाख रुपये
डांबर गॅस बायोडिझेल, पारोळा व मुक्ताईनगर हायवे- 14 लाख रुपये
अवैध लॉटरी – 3 लाख रुपये
रेती -5 लाख रुपये
तालुका विभागानुसार 13 बीट मधील सर्व अवैध धंदयामार्फत 3 लाख रुपये प्रति प्रमाणे -39 लाख रुपये