धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री सांडेश्वर महादेव मंदिरात जान्यासाठी शिवभक्तान्ना नवीन रास्ता मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
धरणगाव नगरपालिका हद्दित शेत जमीन १०४२स्थित सन १६३० साली महाराणी अहिल्याबाई होलकर यांनी जीर्णोधार केलेले प्राचीन मंदीर आहे. सदर मंदीराला शेकडो वर्षापासून धरणी नाल्याला लागून वहीवाट वजा रस्ता होता. सद्याची परिस्थिती बघता मंदिरात ये-जा साठी रस्ताच नाहीय. तर या भागात काही ग्रामस्थ शौचास बसतात. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी होती. विशेष करून श्रावण मासात श्रद्धा भावनेने येणारे हजारो शिव भक्तांना मंदिरात ये जा करताना अक्षरशः चीखल गारा तुड़वत व काटेरी झुड़पे पार करित वाट काढ़ावी लागत होती. मागील अनेक वर्षापासून होणारा त्रास सहन करीत भक्त मंदीराच्या रस्त्यासाठी मागणी करीत होते.
गेल्या ५/६ वर्षापासून गावातील शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते,कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष,पत्रकार पंडित विजयकुमार शुक्ला यांनी परीसरातील शिव भक्तांना सोबत घेवून सदर रस्त्याची मागणी सतत लावून धरली होती. तसेच आंदोलन, उपोषणाचा सुद्धा ईशारा दिला होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी हजारों शिवभक्तांच्या स्वाक्षरीने याबाबत मंदीराच्या रस्त्यासाठी मागणी करण्यात आली होती. सदर चौकशी कामी उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांनी १२ ऑक्टोबर रोजी तहसीलदार मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मंडल अधिकारी, तलाठी,समवेत सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी, मोजमाप करून सुद्धा गेल्या प्रकरण थंड बस्त्यात पडलेले होते.
काही महीन्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पप्पू भावे,विजय महाजन, विलास महाजन, पवन महाजन, पिंटू देशमुख, बाळू जाधव, भैय्या महाजन यांच्यासह सदर मंदिर व रस्त्याची पाहणी करून सदर बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लावून धरली होती. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तात्काल आदेशाने चोपड़ा रस्ता ते श्री सांडेश्वर मंदिरापर्यंत रस्ता दरम्यान असलेल्या धरणी नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी ५० लाख आणि रस्त्यासाठी ३० लाखांची प्रस्तावित रक्कम सर्व साधारण जिल्ल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद कडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे.
लवकरच या रस्त्याच्या कामाची सुरू होणार असून श्री सांडेश्वर मंदिरा समोर असलेल्या श्री भवानी माता मंदीराला सुध्दा ये जा करण्यासाठी पारोळा नाकामार्गे नाविन्यपूर्ण तसेच जलनिस्सारणसह काम मंजूर करून सदरील टेंडर निघाले आहे. श्री सांडेश्वर महादेव मंदिराचे नुकतेच सर्व शिव भक्तांनी नुतनीकरण करून जीर्णोद्धार केलेला आहे. अनेक वर्षापासून या मंदिर रस्त्यांची मागणी पूर्ण झाल्याने धरणगावातील सर्व शिवभक्त आणि भवानी माता भक्तांनी “हर हर महादेव” आणि “जय भवानी” चा जयघोष करून आनंद व्यक्त केला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, प्रथम सूर्यवंशी, बाळा रायपूरकर यांच्यासारखे शिवभक्त देखील याबाबत सतत मागणी करत होते.
असे होणार रस्ते
धरणगाव-चोपडा रोडवरून गणेश ऑटोच्या पुढून साडेश्वर मंदिराकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्यालगत असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत बांधून बाजूला रस्ता तयार करून मंदिरा पर्यंत नेण्यात येणार आहे. तर भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता पारोळा रोडपासून जोडण्यात येणार आहे. या दोघं रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.