यावल (प्रतिनिधी) शहरात आज एका महिलेचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. खून प्रकरणाला आधीच्या हल्ल्याची किनार असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
यावल शहरातील परिसरात शनिवारी 27 ऑगस्ट सायंकाळी उशीरा नजमा खलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्हाडीने वार करून तिला जागीच ठार करण्यात आले आहे. दरम्यान, नाजिया खलील काझी यांच्या हत्या प्रकरणामागे आधीच्या हल्ल्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जावेद युनुस पटेल (वय २८, रा. यावल) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. जावेद पटेल याने दबा धरून नाजिया काझी यांच्यावर कुर्हाडीने दोन वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.