चाळीसगाव (प्रतिनिधी) महान क्रांतिकारक तंट्यातात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच चाळीसगाव तालुक्यात नवीन दहा एकलव्य भवनाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले. यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पवनराजे सोनवणे यांच्यासह संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते.
भगवान वीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, किल्लेदार खेमाजी रगतवान, समशेर सिंग पारधी, ख्वाजा सिंग भिल्ल अशा अनेकांनी आपल्या पराक्रमाने समाजाची मान उंचावली आहे. तंट्या तात्या यांनी इंग्रजांविरुद्ध, जमीनदारी प्रथेविरुद्ध बंड करण्यास सुरुवात केली. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा भारतीय रॉबिनहूड तंट्या भिल यांनी 1870 ते 1880 च्या दशकात मध्य प्रांतातील 1700 गावांमध्ये आणि बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध समांतर सरकार चालवले. चाळीसगाव तालुक्यात वीर एकलव्यांचे स्मारक गावोगाव उभारले जात आहेत. चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एकलव्य भवन बांधकामासाठी 02 कोटी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अजून 10 नवीन एकलव्य भवनाचे काम येत्या महिन्यात सुरू होतील, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
चाळीसगाव तालुक्यात भिल्ल समाजाची लोकसंख्या खूप आहे. मात्र, पहिल्यांदा भिल्ल समाजाचा व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी नियुक्त केला. भिल्ल समाजाचे जिल्ह्यात एकमेव सदस्य आहेत.
शासकीय योजनांपासून वंचित असणाऱ्या भिल्ल समाजाची हजारो जातीची प्रमाणपत्र व रेशनकार्ड आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलीत. समाजाचे प्रश्न, समस्या व त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचून त्या पूर्ण करण्यासाठी लढा, आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून एकलव्य संघटनेने आतापर्यंत सोडवलेले असल्याचे आ. चव्हाण म्हणालेत.
समाजहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले : आमदार मंगेशदादा चव्हाण !
एकलव्य संघटनेचे एकमेव ब्रीद आहे की, समाज पुढारला पाहिजे. समाज पुढे गेला पाहिजे. आतापर्यंत अनेक सरकारे आपण पाहिलेत. पण कुठलेही सरकार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अनुकूल नव्हतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व पवनराजे सोनवणे यांच्या पुढाकाराने इतिहासात प्रथमच भिल्ल समाजासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक मुंबई येथे घेण्यात आली व त्यात समाजहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. धरणगाव येथे ख्वाजा नाईक यांच्या स्मारकासाठी 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला, त्याचे काम सुरू आहे. इयत्ता पहिली ते बारावीसाठी आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आ. चव्हाण म्हणालेत.
योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा उभ्या करून सुधारली जात आहे – मंगेश चव्हाण !
ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी 50 टक्के वस्ती होती. त्याच ठिकाणी ही योजना लागू केली जायची. मात्र, भाजपा सरकारने आता सरसकट आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्ती जिथे असतील, त्या वस्तीतील घरांची संख्या १०/१५ जरी असली तरी तिथे ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत छोटी मोठी प्रत्येक वस्ती रस्ते व पायाभूत सुविधा उभ्या करून सुधारली जात आहे. शबरी घरकुल योजनेसाठी पूर्वी एका तालुक्याला 15 ते 20 घरकुलाचे टार्गेट दिले जायचे, मात्र आता जवळपास 400 ते 500 घरकुलांचे टार्गेट तालुकास्तरावर दिले जात आहे. आपण सर्व मिळून एकदिलाने, एकजुटीने आपल्या सोबत राहून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्वावर कार्य करुया, असेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.