धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून चोरी करत रोकडसह दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकिल गुलाब खाटिक (वय ४८, व्यवसाय मजुरी) हे आपल्या परिवारासह साकरे (ता. धरणगाव) येथे वास्तव्यास आहेत. दि.१५ रात्री ते १६ ऑक्टोबर सकाळच्या दरम्यान, अज्ञात आरोपींनी शकील खाटिक यांच्या घराच्या दरवाजाच्या कडिकोंडा तोंडून घरात प्रवेश केला. यानंतर घरात ठेवलेले लोखंडी पेटीतील ४९, ८०० रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करीत आहेत.