एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल जळगाव नॅशनल हायवे क्र ६ वरील यादव जवळ श्री साई पेट्रोल पंप येथील सार्वजनिक जागी लावलेल्या आयशर गाडीतून २ लाख ७२ हजार ७१७ रुपयांच्या कॅनव्हस बॅगांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पंडित अभिमन पाटील (वय ४४, स्वामी समर्थ नगर पुलकी रो हाऊस रूम नं ९ भाद्रपद सेक्टर सिडको नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात व्यक्तीने पंडित पाटील यांच्या आयशर गाडी क्र MH-१५ GV-६५१० मधुन BLUE DART कुरीयर कंपनीचे २ लाख ७२ हजार ७१७ रुपये किंमतीचे ७३ कॅनव्हस बॅगा त्यामधील ऑनलाईन शॅापींगचे १२७ पार्सल, कागदपत्र व दोन पासपोर्ट पार्सल हे पंडित यांच्या संमतीवाचुन व लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना महेन्द्र पाटील करीत आहेत.