अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसले शिवारातील गट नं ५१ व ५२ मधील गोडावून मधून रासायनिक खतांच्या गोण्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रवींद्र निंबा पाटील (वय ४०, रा. म्हसले ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ एप्रिल २०२२ रोजीचे सायंकाळी ६.०० वाजेनंतर ते दि. १३ एप्रिल २०२२ रोजीचे सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे शेतातील गोडाऊनचे कुलुप तोडुन गोडाऊनच्या आत प्रवेश केला. त्यानंतर ४२ हजार रुपये किंमतीचा पी.के.व्ही टू जातीचा हरभरा १४ गोण्या प्रत्येकी अंदाजे ५० किलो वजन. सदर गोण्या या रासायनिक खताच्या होत्या. तसेच २८ हजार रुपये किंमतीच्या डॉलर जातीचा हरभरा ८ गोण्या प्रत्येकी अंदाजे ५० किलो वजनाच्या. सदर गोण्या या रासायनिक खताच्या होत्या, असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ कपील पाटील हे करीत आहेत.