जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण ७९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील नवीन जोशी कॉलनीमध्ये जयंत राजू गोंधळी (वय -३१) तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. मार्केटिंगचा व्यवसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातून ६० हजार रुपयांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७९ हजार ५०० किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. त्यानंतर जयंत गोंधळी याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.