धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद कक्षाच्या कार्यक्षेत्रातील झुरखेडा शिवारातील अॅल्युमिनीयमच्या विद्युत वाहक ताराची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महारु पुंडलिक मोरे (वय ३३ रा. पाळधी ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सोनवद कक्षाच्या कार्यक्षेत्रातील झुरखेडा शिवारात हेमंत अमृत चौधरी यांच्या शेत गट नं. ७८ मध्ये हेमंत अमृत dtc (४२३१२२०) या कोडचा ट्रान्सफॉर्मर पासुन दोन्ही दिशाकडील ११ span LT conducter पोलवरील १९८० मीटर लांबीच्या अॅल्युमिनीयमच्या विद्युत वाहक तार त्याची किमंत अंदाजे ३९,६०० रुपये असे माझ्या संमतीवाचुन लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ राजेंद्र कोळी करीत आहेत.