TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेच्या पीओएच कारखान्यात आठ लाखांची चोरी ; रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह तिघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांच्या पॉवर केबल चोरीत रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या हवालदारासह तिघांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. अटकेतील संशयितांमध्ये सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ), राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांचा समावेश आहे.

असे आहे चोरी प्रकरण !
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून सात लाख 94 हजार 227 रुपये किंमतीची 1604 किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार 15 ते 16 डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. तत्पूर्वी पीओएच कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरा, लेबर मेन गेट व सायकल स्टॅण्ड गेट, वर्कशॉप फेसिंग कॅमेरा, इरेक्शन फेसिंग कॅमेरा यांच्याशी छेडछाड करण्यात आल्याची बाब 11 नोव्हेंबर 2023 रोजी स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणेचा संशय बळावला व त्यानंतर साहित्य तपासणी केल्यानंतर त्यात लाखोंची महागडी पॉवर केबल चोरीला गेल्याचे समोर आले.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

विशेष पथकाकडून चौकशी अन् आरोपी जाळ्यात !
रेल्वे सुरक्षा बलाचे डीएससी एच.श्रीनिवासराव व एएससी अशोक कुमार यांच्या नेतृत्वात चोरीच्या तपासासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यात सीआयबी निरीक्षक एल.के.सागर, एसआयबीचे आशित शेख, विनोद खरमाटे, वसंत महाजन, अमोल पाटील, मनोज सोनवणे, इम्रान खान, महेंद्र बाबू कुशवाह, कॉन्स्टेबल गिरीराज जाधव, कॉन्स्टेबल निलेश पाटील यांचा समावेश होता. विशेष पथकाने तपासादरम्यान पीओएचमधील कंत्राटदार अंजूम पटेल यांच्याकडे काम करणारा राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) यास सुरूवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतले.

आरपीएफ हवालदारासोबत केली चोरी !
संशयित राहुल मोरे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीकामी सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) याचे सहकार्य लाभल्याचे सांगितल्याने त्यास गुन्ह्यात आरोपी करून त्यास अटक करण्यात आली. दोघा संशयितांच्या कबुली जवाबात आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांनी गुन्ह्यात मुद्देमाल विक्रीतून आलेली निम्मे रक्कम स्वीकारल्याचे व चोरीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना गुन्ह्यात आरोपी करून त्यांनाही अटक करण्यात आल्याचे समजते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

स्वच्छता कर्मचाऱ्याचा असाही सन्मान ; पालकमंत्र्यांनी दिला कामाच्या उद्घाटनाचा मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट बिलं तयार करत सुबोनीयो आणि समृद्धी कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा !

October 20, 2022

काळजी घ्या…जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

January 1, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑगस्ट 2025 !

August 2, 2025

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटीबध्द : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group