धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद खुर्द येथील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी मोटार, वायर व स्टाटर्सची चोरी केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजेद्र मथुरादास भाटीया (वय,४५, व्यवसाय शेती रा. सोनवद खु) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोनवद खुर्द शिवारात शेत गट नं. ३४ / २ या शेतातील विहरीत साधारण १० हजार किंमतीची इलेक्ट्रिक मोटर, वायर होती. दि. १८ ते १९ मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक मोटर, वायर चोरून नेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना दिपक पाटील हे करीत आहेत.