धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाने येथील शेतीतील साधारण १ कि.मी. विजेचे तार चोरी झाल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क साधून व्यथा मांडली. यानंतर घटनास्थळी भेट देत वाघांनी भेट देत केली महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करणेबाबत विनंती केली.
घटनास्थळावरून गुलाबराव वाघ यांनी विद्युत अधिकारी पवार साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे,अशी मागणी केली. त्यावर दोन-तीन दिवसात लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावे, असे आश्वासन पवार साहेब यांनी दिले. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, दीपक सोनावणे, सरपंच किशोर पाटील, अमोल पाटील, ग्रामसेवक मुरलीधर अण्णा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.