धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मोटार सायकल चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीय. मोटार सायकलवर आलेले दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
धरणगाव सराफ बाजारातुन मोटार सायकल चोरीला गेली आहे. सराफ बाजारात दोन अज्ञात व्यक्ती मोटार सायकलवर येतात आणि यातील मागील व्यक्ती मोटार सायकल चोरी करते. दरम्यान, गोल लाईट असलेली गाडी तसेच फोटोत दिसत असलेले चोरट्यांबाबत माहिती असल्यास धरणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी केले आहे.