जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथील रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नशिराबाद गावानजीक असलेल्या शिवशक्ती कार बाजारच्या बाजूला गोडे तेलाचे डबे भरून आणलेला आयशर ट्रक रोडच्या बाजूला बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता पार्किंगला लावून चालक संतोष देवीदास डाबेराव (वय ४५) रा. बल्लभनगर, आकोला आणि क्लिनर अंकित रवी शिरसाळे हे झोपले होते. गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ अंकित रवी शिरसाळे हे झोपले होते.
मध्यरात्री १ वाजेच्या अज्ञात पाच चोरट्यांनी आयशर ट्रकमध्ये असलेला तब्बल ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे तेलाचे डबे दुसऱ्या ट्रकमध्ये भरला. यावेळी क्लिनर अंकित शिरसाळे याला जाग आल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी ट्रक घेऊन पळ काढला. त्यानंतर चालक संतोष डाबेराव यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.
















