नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालकीची पाण्याची इलेक्ट्रीक मोटारची चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १० ते ११ मार्चच्या दरम्यान संशयित आरोपी अक्षय सुरेश भदाणे आणि गिरीष सुकलाल पाटील (दोन्ही रा. नांदेड ता. धरणगाव) यांनी नांदेड ग्रामपंचायत कार्यालया समोरील संतोष सखाराम शिरसाठ यांच्या मालकीच्या लोखंडी टपरी जवळ ठेवलेली टेक्सो कंपनीची ५ हजार रुपये किंमतीची पाण्याची इलेक्ट्रीक मोटार चोरुन नेली. या प्रकरणी भूषण राजेंद्र अत्तरदे (वय ३०, रा.नांदेड) यांच्या फिर्यादीवरून अक्षय भदाणे आणि गिरीष पाटील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.
















