मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तुम्हारा लडका लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिकांनी म्हटलं, पहिल्या दिवसापासून शाहरुख खानला घाबरवलं जात आहे की, नवाब मलिकने जर बोलणं बदल केलं नाही तर तुझा मुलगा गेला…. (तुम्हारा लडका लंबा जायेगा). पूजा ददलानी यांना कदाचित घाबरवलं जात आहे की, ५० लाख तुम्ही दिले तर तुम्ही सुद्धा आरोपी बनणार. पण घाबरण्याचं कारण नाही. देशात जर कुणाच्या मुलाला किडनॅप करुन कुणी खंडणी मागत असेल आणि घाबरुन जर एखाद्याने पैसे दिले तर तो व्यक्ती गुन्हेगार नाही तर पीडित आहे. घाबरु नका. समोर या आणि सतक्य सर्वांना सांगा. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी मला मदत करा, असं मलिकांनी म्हटलं आहे.
मला माहिती नाही कोण-कुणाला घाबरवत आहे. समीर वानखेडे हे कुणाला फोन करत आहेत हे मी सर्व काही आज बोलणार नाही. अनेक महिलांना घाबरवलं जात आहे. अनेक नागरिकांना घाबरवलं जात आहे. प्रायव्हेट आर्मी सक्रिय आहे. या प्रकरणातील व्हिलन जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.