नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने संपूर्ण जग धास्तावला आहे. यानंतर ब्रिटन आणि युरोप येणाऱ्या विमानांची वाहतूक रोखण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. कोरोनाचा नाव स्ट्रेन जास्त धोकादायक असल्याने अनेक देशाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा अद्याप एकही रुग्ण नसल्याचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
कोरोनाच्या नव्या प्रकाराने ब्रिटनची कोंडी केली आहे. आढळून आलेल्या या विषाणूमुळे ब्रिटन पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये गेलं आहे. तर जगभरातील राष्ट्रांचीही चिंता वाढली आहे. भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असून, आणखी एक समाधानाची बाब म्हणजे कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण देशात अजूनही आढळलेला नाही, मात्र चिंता कमी झालेली नाही. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या विषाणूचं संक्रमण झालेले अनेक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे जगातील इतर राष्ट्रांनी ब्रिटनहून येणारे हवाई मार्ग बंद केले आहेत. भारतातही सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, देशात अद्याप कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आलेली नाही. याविषयी आजतकशी बोलताना एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सध्याच्या घडीला जगभरात कोरोना संशोधन सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असल्याने काही कंपन्यांच्या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही देशांनी लसीकरणा सुरुवात केली आहे. एकीकडे जग कोविड-१९ संकटातून बाहेर आल न आता कोविड -२०ची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर कोविड -२० ट्रेंडीग आहे.