TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ; पालकमंत्री छगन भुजबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचा फैलाव वाढत असतांना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असतांना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे, डॉ. आवेश पलोड, रंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असुन ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान ! वीज बिल भरताना अशी होतेय फसवणूक

May 11, 2022

ब्रेकिंग: पोलीस कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडून उकळली 1.20 लाखांची खंडणी; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

May 19, 2025

खडसेंकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न ; कॉंग्रेसचे चंदन पाटील यांचा खळबळजनक आरोप !

April 20, 2022

मिळालेल्या मतदान पेक्षा गावाची गरज पाहून विकास महत्त्वाचा !

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group