TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मिळालेल्या मतदान पेक्षा गावाची गरज पाहून विकास महत्त्वाचा !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन ; वचनपूर्ती कार्यक्रमात विकासाची ग्वाही

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एखाद्या गावाने आपल्याला मतदान दिले की नाही हा महत्वाचा मुद्दा नसून यापेक्षा त्या गावाची गरज काय ? हे पाहून विकासाला आपण सातत्याने प्राधान्य दिले आहे. यामुळे पथराडसह अन्य गावांच्या गरजा लक्षात घेऊन आपण विकास करत असतो, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

पथराड, वंजारी खपाट, टहाकळी आणि आव्हाणी या गावांमधील रस्त्यांचे भूमिपुजन आणि अन्य कामांच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणाच्या पलीकडे जात आपण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

१ कोटी ४५ लक्ष कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन आणि अन्य कामांचे लोकार्पण करण्यात आले. यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पथराड ते वंजारी खपाट रस्त्याची डांबरीकरणसह विशेष दुरूस्ती, पाळधी-फुलपाट ते आव्हाणी रस्त्याची विशेष दुरूस्ती, पथराड ते चांदसर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण, आव्हाणी ते दोनगाव रस्त्याचे डांबरीकरण या रस्त्यांचे भूमिपुजन करण्यात आले. तर पथराड बुद्रुकला स्मशानभूमि, येथेच पेव्हर ब्लॉक बसविणे, स्मशानभूमि दुरूस्ती व पेव्हर ब्लॉक बसविणे, फुलपाट गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, टहाकळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, आव्हाणी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे आणि पथराड येथे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांच्या लोकार्पणाचा समावेश होता. या सर्व कामांचे एकत्रीत मूल्य सुमारे १ कोटी ४५ लाख इतके आहे. याप्रसंगी परिसरातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.प. सदस्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भांडणे लावणारांचा हेतू लक्षात घ्या

दरम्यान, यानिमित्त पथराड येथे आयोजीत कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पथराडसह परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन रोडचे काम करण्यात येत आहे. कोणतीही राजकीय लाभ-हानी लक्षात न घेता त्या गावाची गरज लक्षात घेऊन विकासकामे करीत आहे. मात्र जे कुणी गावात भांडणे लावतात, गावात फुट पाडतात, मने कलुषीत करतात त्यांचा हेतू लोकांनी लक्षात घेऊन अश्या मंडळींना थारा देता कामा नये. असे मत ना. पाटील यांनी व्यक्त केले. तर पक्षविरहीत विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आमदार निधीची उपयुक्तता वाढली

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य शासनाने आता ४ कोटी रूपयांच्या आमदार निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील त्या – त्या मतदारसंघातील वाढीव कामे करता येणार आहे. तर यासाठी १० लाखांवरील कामे हेच फक्त ई-निवीदेने होणार आहे. यामुळे आता विकास कामांची गती वाढून विकासासाठी कोणताही अडसर येणार नसल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य डॉ. दीपक पाटील व मिथुन पाटील यांनी केले तर याप्रसंगी प. स. सभापती मुकुंदराव नंनवरे व जि. प. सदस गोपाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.

याप्रसंगी प. स. सभापती मुकुंदराव नंनवरे व जि. प. सदस प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी प. स. सदस्य प्रेमराज पाटील, दामू आण्णा पाटील, गजानन पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, परिसरातील सरपंच मनीषा महाजन, उत्तम भिल, वसंत लंके, विलास महाजन, आव्हाणी, टहाकळी फुलपाट येथील सरपंच हरी पाटील, दीपक चव्हाण, सदाशिव पाटील, उपसरपंच दिलीप पाटील, दत्तू पाटील, शाखा प्रमुख विठोबा पाटील, भिका पाटील, अशोक पाटील परिसरातील सर्व ग्रा.पं. सदस्य लहू लंके, किरण बोरसे, चोरगाव सरपंच आबा लंके, नवल कोळी, संजय गांधी निराधार योजनचे सदस्य संजय महाजन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मुख्य अभियंता जे. एस. सोनवणे, अरुण पाटील, अनिल पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, मच्छिंद्र कोळी व नवल पाटील आदी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

डॉक्टराकडून पीएसआयला मारहाणीचा प्रयत्न, भुसावळ शहर पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदोन्नती मिळाल्याबद्दल विशाल मकवाने यांचा सन्मान

January 10, 2022

वर्डीची कार्तिकी सांळुखे विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी !

September 10, 2023

जळगाव : दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर !

September 3, 2024

जळगाव एमआयडीसी हद्दीतील 18 गुन्हेगार हद्दपार !

September 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group